अहमदपूर : इंधन दरवाढ व महागाईविरोधात आणि केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ बुधवारी अहमदपुरात शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
शहरातील दीपवर्षा मंगल कार्यालयापासून या सायकल रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सांब महाजन, तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, माजी तालुकाध्यक्ष भारत रेड्डी, जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रकांत मद्दे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शिराज जहागीरदार, शहराध्यक्ष विकास महाजन, ओबीसी तालुकाध्यक्ष लहू शेवाळे, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष प्रकाश ससाने, बाबासाहेब देशमुख, धनराज गिरी, राजू पाटील, दादा देशमुख, सुरेंद्र पाटील, मुज्जमिल सय्यद, सलमान पठाण, शिवाजी जंगापल्ले, शहाजीराव पाटील, बंडू येरमे, संदीप गुट्टे, अफरोज पठाण, अशोक माने, सुभाष शेटकर, माधव जाधव, राम नरवटे, प्रमोद उजनकर, शहाजी साखरे, दिनकर कदम, सद्दाम पठाण, रेणुकादास पांचाळ, आदी उपस्थित होते.