लातूर : दरवर्षी विविध संकटाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढत असतात. २०२०-२१ मध्ये खरीप हंगामात पीकविमा हप्त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकारने मिळून सुमारे ६७१ काेटी रूपये भरले हाेते. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भपाई म्हणून केवळ ११२ काेटी रूपये मिळाले. परिणामी साडेचारशे ते पाचशे काेटींचा विमा कंपनीला फायदा झाला आहे.
वादळी वारे, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, राेगराई आदी कारणांमुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठे नुकसान हाेते. अनेकवेळा काढणीला आलेली पिके वाया जातात. अशावेळी शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे काेलमडून पडते. आर्थिक कणाच माेडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डाेक्यावरील कर्जाचा बाेजा वाढत जाताे. यातून आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलतात. दरम्यान, शेतकऱ्यांचे अर्थकारण माेडून पडू नये, यासाठी पिकांचा विमा उतरविला जाताे. यातून शंभर टक्के नुकसान भरून निघत नसले तरी किमान उत्पादन खर्च हाती पडताे. मागील काही वर्षांत विशेषकरून खरीप पिके काढणीला आली असताना नैसर्गिक संकटे ओढावतात. हा अनुभव लक्षात घेता शेतकरी आता आपी पिके विमा संरक्षित करण्याकडे वळले आहेत. हीच संधी साधत विमा कंपन्यांनीही आपले उखळ पांढरे करून घेऊ लागल्या आहेत. २०२०-२१ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील सुमारे १० लाख ४४ हजार २३२ अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला हाेता. शेतकऱ्यांनी आपल्या हिस्स्यापाेटी ४९ काेटी ७४ लाख, राज्य शासनाच्या हिस्स्यापाेटी ३१६ कोटी आणि केंद्र सरकारने स्वताच्या हिस्स्यापाेटी ३०८ कोटी असे एकूण ६७१ कोटी रूपये विका कंपनीकडे भरले हाेते. प्रत्यक्ष भरपाई मात्र २ लाख २४ हजार ८४९ अर्जदार शेतकऱ्यांनाच मिळाली आहे. ही रक्कमही ११२ काेटी आहे. त्यामुळे या व्यवसायात शेतकरी ताेट्यात अन् विका कंपनी पाचशे ते साडेपाशे काेटींनी फायद्यात राहिली आहे. म्हणजेच शेतकरी नव्हे, तर विका कंपनी मालामाल झाली आहे. हे असेच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांची विमा कंपन्यांवरील विश्वास नष्ट हाेण्यास फारसा अवधी लागणार नाही.
खरीप हंगाम २०२०-२१
पीकविमा लागवड क्षेत्र ५,८८,८४९ हेक्टर
एकूण जमा रक्कम ६७१ कोटी
एकूण पीक विमा मंजूर -१११.७२ लाख
प्रत्यक्ष शेतकर्यांनी भरलेले पैसे -४९.७४ लाख
राज्य सरकारने भरलेले पैसे -३१६ कोटी
केंद्र सरकारने भरलेले पैसे - ३०८ कोटी
विमा काढणारे शेतकरी -१०,४४,२३२
लाभार्थी शेतकरी - २२,४१,११४
आतापर्यंत वाटप केलेली रक्कम -१११.७२ कोटी
विमा भरुनही भरपाई नाही...
मागील वर्षी अतिवृष्टीने हाती काही लागलेच नाही. खरीप हंगामाचा पिकविमा काढला होता. मात्र, छदामही मिळालेला नाही. त्यामुळे विमा काढून पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. पिकाचे सरंक्षण म्हणून विमा काढला मात्र, शासनाच्या दूर्लक्षामुळे विमा मिळालेला नाही. कंपन्यानी विमा द्यावा. - अण्णासाहेब महामुनी