...
माकेगावात १५० जणांना कोविड लसीकरण
रेणापूर : तालुक्यातील माकेगाव येथील प्राथमिक आरोग्य शाळेत कोविड लसीकरण करण्यात आले. त्यात १५० जणांना लस देण्यात आली. यावेळी सरपंच प्रभाकर केंद्रे, उपसरपंच प्रा. नीळकंठ लहाने, डॉ. सय्यद, कारेपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेड्डी, डॉ. सय्यद, परिचारिका लव्हारे, मुख्याध्यापक मुदाळे, आदी उपस्थित होते. यावेळी ४५ वर्षांपुढील ४५ जणांनी लसीकरण करून घेतले.
...
बोरोळच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
लातूर : देवणी तालुक्यातील बोरोळ येथील ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याने चार दिवसांपासून गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढल्याने भीती व्यक्त होत आहे; तर दुसरीकडे पाण्यासाठी नागरिकांची कसरत होत आहे. पाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
...
कबनसांगवी येथे जयंतीनिमित्त अभिवादन
चाकूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कबनसांगवी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनुश्री सांगवे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच मीनाक्षी राजारूपे, मंगलबाई दुवे, पोलीस पाटील सोपानदेव पाटील, राजकुमार सांगवे, आदी उपस्थित होते.
...
रोहिणा येथे अभिवादन कार्यक्रम
चाकूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील रोहिणा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच वैजनाथ जिवलगे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र नागरगोजे, बालाजी डोंगरे, प्रा. भीष्मनारायण केंद्रे, ग्रामपंचायत कर्मचारी अहमद शेख, देविदास कांबळे, आदी उपस्थित होते.