शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
3
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
4
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
5
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
6
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
7
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
8
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
9
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
10
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
12
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
13
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
14
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
15
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
16
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
17
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
18
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

महामार्गावर वाहनांचा वेग वाढविल्याची किंमत १ काेटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

लातूर शहर वाहतूक शाखेला इंटर सेप्टर व्हॅल डिसेंबर २०१९ मध्ये प्राप्त झाले. तेव्हापासून लातूर शहरातील विविध मार्गासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ...

लातूर शहर वाहतूक शाखेला इंटर सेप्टर व्हॅल डिसेंबर २०१९ मध्ये प्राप्त झाले. तेव्हापासून लातूर शहरातील विविध मार्गासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर भरधाव वाहनांना आवर घालण्यासाठी वर्षभर कारवाई केली जाते. पाेलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईत काेट्यवधींचा दंड ठाेठावण्यात आला आहे. अनेकांवर खटले दाखल करण्यात आला आहे. मात्र, वाहनधारकांच्या वेगाची मर्यादा काही आवाक्यात यायला तयार नाही. भरधाव वाहन चालविणे, निष्काळजीपणे, हयगयपणे वाहन चालविण्यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत. डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२१ या कालवधीत माेठ्या प्रमाणावर पाेलीस पथकांनी कारवाई करण्यात आली आहे.

धावत्या वाहनाची माेजली जाते वेगमर्यादा...

लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेला प्राप्त झालेल्या इंटर सेप्टर व्हॅन आणि ओव्हर स्पीड गनच्या माध्यमातून धावणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा माेजली जाते. ज्यांनी निर्धारित वेगमर्यादा ओलांडाली आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. शिवाय, काही वाहनांवर खटलेही दाखल केले जातात. जवळपास ५०० मीटर अंतरावरील वाहनांचा वेग या व्हॅनद्वारे, ओव्हर स्पीड गनद्वारे माेजता येते.

एसएमएसवर मिळते पावती...

वाहनधारकांना ऑनलाइन दंड केल्यानंतर एका एसएमएसवर संबंधितांना पावती, मेसेज मिळताे. यातून त्यांना ताे ई-चालानची रक्कम भरावी लागते. जर एखाद्याने दंडाची रक्कम नाही भरली तर त्यांच्या नावावर, वाहनावर थकबाकी दाखविण्यात येते. दंडातून वाहनधारकांची सुटका मात्र नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.

असा केला ठोठावला दंड...

जानेवारीमध्ये १ हजार ५२ वाहनधारकांना ९ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. फेब्रुवारी - ५३९ वाहनांना ५ लाख ३५ हजार ९००, मार्च - १ हजार ११४ वाहनांना ११ लाख १२ हजार ५००, एप्रिल - १ हजार ३९७ वाहनांना १३ लाख ८६ हजार ५००, मे महिन्यात १ हजार ५०५ वाहनधारकांना १४ लाख ७६ हजार ५००, जून - २ हजार २९२ वाहनांना २२ लाख ६१ हजार ५००, जुलै महिन्यात १ हजार ६७७ वाहनांना १५ लाख ८६ हजार ५०० आणि ऑगस्ट महिन्यात १ हजार ५५९ वाहनांना १४ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.