खरोसा येथील आरोग्य उपकेंद्रात खरोसा व रामेगाव ही दोन गावे आहेत. गत वर्षीच्या एप्रिलपासून ते यंदाच्या एप्रिल या कालावधीत आरोग्य उपकेंद्राअंतर्गत ६६ जणांना कोविडची लागण झाली होती. त्यापैकी ६३ जण उपचारानंतर ठणठणीत झाले आहेत. खरोसा येथील ५० जणांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, दोघांचा मृत्यू झाला होता. रामेगाव येथील एकूण १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर १५ जणांनी कोरोनावर मात केली, अशी माहिती लामजना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पेंढारकर यांनी दिली.
३१७ जणांना लस...
लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि खरोसा येथे दर आठवड्याला कोविड लस दिली जात आहे. खरोसा उपकेंद्रांतर्गत खरोसा व रामेगाव येथील ३१७ जणांनी कोविड लस घेतली. तसेच करजगाव, कार्ला, लामजना, मोगरगा, तपसे चिंचोली आणि मोगरगा येथील ९९८ जणांनी कोविड लस घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पेंढारकर यांनी दिली.