शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कराराची मुदत केव्हाच संपली, तरी लातूरात युनिपोलवरून जाहिराती जोरात

By हणमंत गायकवाड | Updated: May 22, 2024 13:07 IST

लातूर महापालिकेच्या नोटिसीला न जुमानता राजरोसपणे एजन्सी जोमात कारभार करत आहेत

लातूर : शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग, युनिपोलचा बाजार तेजीत असून महानगरपालिकेच्या नोटिसीला न जुमानता अनेकजण आपला व्यवसाय पुढे रेटत आहेत. एका युनिपोल एजन्सीधारकाने तर करार संपल्यानंतर तीन वर्षांपासून राजरोसपणे व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्या एजन्सीला महानगरपालिकेने दोन वेळा नोटिसा पाठवल्या. मात्र नोटिसीला उत्तर न देता एजन्सीधारकाने युनिपोलवरून जाहिरात व्यवसाय अधिक गतीने वाढविला आहे.

लातूर शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भुयारी मार्ग सुरू होणाऱ्या दुभाजकामध्ये जाहिरात लावण्यासाठी युनिपोल उभारण्यात आलेला आहे. १६ डिसेंबर २०१९ पासून या युनिपोलवरून एक एजन्सी जाहिरातीचा व्यवसाय करते. १६ डिसेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०२० पर्यंत व्यवसाय करण्यासाठी मनपाने त्या एजन्सीला परवानगी दिलेली आहे. एक वर्षाच्या मुदतीसाठी ही परवानगी होती. त्यासाठी ३३ हजार २४ रुपये करभरणा केला आहे. प्रस्तुत वर्षाचे शुल्क संबंधित एजन्सीधारकाने भरले. मात्र त्यानंतर आजतगायत ना शुल्क भरलेले आहे, की परवानगी घेतलेली आहे. उलट महानगरपालिकेने दोन वेळा संबंधित एजन्सीला नोटीस पाठवून जाहिरात कराचा भरणा करून घ्यावा. मुदत संपली असल्याने बोर्ड काढून घ्यावेत, असे सूचित केले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून एजन्सीचा व्यवसाय सुरू आहे. २६ युनिपोलला महापालिकेने नव्याने मंजुरी दिली आहे. त्यात हा युनिपोल नाही. शिवाय, २६ युनिपोलची एजन्सीही वेगळी आहे.

१५ डिसेंबर २०२० रोजी मुदत संपली१५ डिसेंबर २०२० रोजी मुदत संपल्यानंतरही कोणाच्या पाठिंब्यावर एजन्सी युनिपोलवरून व्यवसाय करत आहे. महानगरपालिकेने नोटीस पाठविल्यानंतर पुढील कारवाई का केली नाही? नोटिसा पाठवण्याचा फक्त सोपस्कार केल्याचे दिसत आहे. मुदत संपून एक नव्हे, तीन वर्षे उलटलेले आहेत; तरीही कारवाई नाही. याला कोण जबाबदार आहे. याचे उत्तर महापालिकेला द्यावे लागणार आहे.

कराराची मुदत संपून तीन वर्षे उलटली, तरीही कारवाई नाही...३० मे २०२३ आणि १ नोव्हेंबर २०२३ या तारखांत एजन्सीला दोन नोटिसा दिल्या. मात्र एजन्सीने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. महापालिकेनेही कारवाई टाळल्याचे दिसते. कराराची तीन वर्षे मुदत संपून व्यवसाय का करू दिला? कोणी परवानगी दिली? याबाबत महानगरपालिका प्रशासन काय निर्णय घेणार, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका