औसा तालुक्यातील नागरसोगा ग्रामपंचायतीच्या वतीने बिहार पॅटर्न अंतर्गत ६७० रोपांची लागवड स्मशानभूमीत, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत क्षेत्रात करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी एस.जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, विस्तार अधिकारी बालाजी तेलंग, तलाठी रोहित धावडे, ग्रामसेवक विलास चौधरी, पंचायत समिती सदस्य भास्करराव सूर्यवंशी, उपसरपंच बंडू मसलकर, शिवाजी फावडे आदी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे म्हणाले, पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली युवा पिढीने एकत्र येऊन वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवावा.