निलंगा येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुढाकारातून सुरु करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले. याेवळी ते बाेलत हाेते. कर्यक्रमाला भाजयुमोच्या प्रदेश पदाधिकारी प्रेरणा होनराव, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस तथा माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे, पंचायत समितीचे सभापती राधाताई बिराजदार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर चेवले यांच्यासह केंद्राचे समन्वयक तानाजी बिराजदार यांची उपस्थिती होती.
कोरोनाने अर्थव्यवस्थेला खिळ बसली होती. मात्र अर्थव्यवस्थेला अधिक गतीने चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत ही योजना सुरु करण्यात आली असल्याचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.
निलंगा येथे आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून या योजनेची अधिकाधिक माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करून माजी मंत्री आ. निलंगेकरांनी बचत गट, कृषी गट, सेवाभावी संस्था, आरोग्य संस्था यासह नवीन उद्योग करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासह केंद्र सरकारच्या वतीने लोकहिताच्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती केंद्राच्या माध्यमातून होणे अपेक्षीत आहे.
जिल्हाभरात आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र सुरु व्हावीत, यासाठी कार्यकरणीची घोषणा माजी मंत्री आ. निलंगेकरांनी यावेळी केली. यामध्ये जिल्हा संयोजकपदी तानाजी बिराजदार तर सहसंयोजक म्हणून रमेश सातपुते, सचिन बाहेती, आनंद अट्टल, रामलिंग शेरे, अमोल निडवदे, बाळासाहेब बिरादार, अशिष पाटील, दत्ता शिंदे, रवि फुलारी, प्रमोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.