येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्या. ए.व्ही. गुजराथी यांच्या हस्ते झाले. लोक अदालतीमध्ये एकुण १ हजार ४४१ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी दिवाणी स्वरुपाची ७४,फौजदारी स्वरुपाची ७९, तर वादपूर्व ७ प्रकरणे अशी एकुण १५३ प्रकरणे निकाली निघाली. यात १ कोटी ७० लाख ५५ हजार ७३४ रुपये वसूल झाले.
जिल्हा व सत्र न्या. ए.व्ही. गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली न्या. आर.बी. गिरी, न्या.बी. व्ही. दिवाकर, न्या. सुभेदार, न्या. आर.बी. राऊत यांच्या नेतृत्वाखालील चार पॅनलच्या माध्यमातून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली. पॅनलमध्ये पत्रकार राम मोतीपवळे, प्रा. दत्ताहरी होनराव, प्रा. विश्वंभर गायकवाड, अनंत कदम, ॲड. भाले, ॲड. पवन कोणे, ॲड. आर.एम. सोनकांबळे, ॲड. एम. डी. पठाण यांनी काम पाहिले.
यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधिक्षक एस.आर. कुलकर्णी, ए.के. सोनसाळे, एस.आर. हाळीकर, पी.एस. जाधव व कर्मचा-यांच्यासह तालुका विधी सेवा समिती, विधीज्ञ मंडळींनी परिश्रम घेतले.