शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद, खेड्यापाड्यातील रुग्णांचे औषध, गोळी न मिळाल्याने हाल

By हरी मोकाशे | Updated: February 1, 2023 17:01 IST

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे एकदिवसीय काम बंद

लातूर : शासन सेवेत कायम करावे तसेच गट ब चा दर्जा देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने बुधवारी राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील १६७ उपकेंद्रातील आरोग्य सेवा ठप्प झाली. परिणामी, सर्दी, डोकेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांना गोळी मिळविण्यासाठी तापच आला.

गेल्या काही वर्षांपासून समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्रात कार्यरत आहेत. जिल्ह्यात एकूण २५२ उपकेंद्र असले तरी काही उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे उर्वरित १६७ ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी सेवा देत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने गत जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले होते. मात्र, शासनाने त्याची दखल न घेलत्याने बुधवारी पुन्हा मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले.

या मागण्यांसाठी झाले आंदोलन...सन २०१७ पासून ५ टक्के वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस मिळावे. वेतन व कामावर अधारित वेतनाचे प्रमाण बदलून निश्चित वेतन ३६ हजार द्यावे आणि कामावर आधारित वेतनात वाढ करावी. तसेच बदलीसंदर्भात धोरण निश्चित करावे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनानुसार पदोन्नती मिळावी. टीए-डीए देण्यात यावे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळावे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.

१६७ उपकेंद्रातील सेवा ठप्प...जिल्ह्यातील १६७ उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केल्याने जिल्ह्यातील १६७ उपकेंद्रातील आरोग्य सेवा दिवसभर ठप्प झाली होती. त्यामुळे डॉक्टरवगळता अन्य आरोग्य कर्मचारी पहावयास मिळत होते. सध्या वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी, तापीच्या रुग्णांत वाढ झाली आहे. गावात उपकेंद्र असतानाही बुधवारी रुग्णांना गोळ्या, औषधी न मिळाल्याने खाजगी दवाखान्याकडे धाव घ्यावी लागल्याचे पहावयास मिळाले.

शासनाने दखल घेणे गरजेचे...कोविड काळात आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. याशिवाय, तेरा प्रकारच्या नियमित सेवा देतात. तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊन ते पूर्ण करतात. त्यामुळे शासनाने दखल घेऊन मागण्या मान्य करणे गरजेचे आहे.- डॉ. शिवाजी गोडगे, जिल्हाध्यक्ष, समुदाय आरोग्य अधिकारी संघटना.

टॅग्स :laturलातूरmedicineऔषधं