जळकोट : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे. त्यामुळे पदवीधरांच्या समस्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
जळकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मन्मथ किडे होते. यावेळी नितीन बावगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख संगम टाले, ज्येष्ठ साहित्यिक विलास सिदंगीकर, विठ्ठल चव्हाण, गोविंदराव माने, उस्मान मोमीन, धोंडिराम पाटील, महेश धुळशेट्टे, विनायक जाधव, संग्राम कांबळे, विठ्ठल चंदावार, कैलास पाटील, गजानन दळवे, संग्राम नामवाड, ओमप्रकाश पाटील, आकाश वाघमारे, बालाजी उगिले, आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी साहित्यिक विलास सिदंगीकर यांची निवड झाल्याने त्यांचा व संग्राम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन चंद्रकांत मोरे यांनी केले तर विनायक जाधव यांनी आभार मानले.