वाचनालय बांधकाम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. यावेळी संस्थेचे सचिव मनोहर पटवारी, रामचंद्र तिरुके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, सभापती शिवाजी मुळे, रमेश अंबरखाने, डॉ. रामप्रसाद लखोटिया, महादेव नौबदे, उपसभापती रामराव बिरादार, डॉ. श्रीकांत मध्वरे, तहसीलदार रामेश्वर गोरे यांची उपस्थिती होती. तसेच अन्य ठिकाणच्या कामाप्रसंगी उपअभियंता पी. एस. भोसकर, कल्याण पाटील, विजय निटूरे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, बालिका मुळे, श्याम डावळे, गजानन सताळकर, समीर शेख, प्रवीण भोळे, गजानन बिरादार, अमोल घुमाडे, माधव कांबळे यांची उपस्थिती होती.
महात्मा गांधी वाचनालयास आमदार निधीतून २५ लाखांचा निधी दिला असून, सदरचे वाचनालय सुसज्ज करण्यासाठी आणखीन २५ लाखांचा निधी देणार असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जाहीर केले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. आभार प्रा. मल्लेश झुंगा स्वामी यांनी मानले.