कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप उत्तम महाराज धानोरकर होते. यावेळी सभापती शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, अभियंता शेख, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, संचालक श्या पाटील, सरपंच कमलबाई वाघमारे, उपसरपंच नितीन पाटील, मोघाचे सरपंच कदम, आर.आर. पाटील, बळीराम मुळे, पोलीस पाटील बबन पेड, अर्जुन पेड, व्यंकोबा पेड, बबन पाटील, साहेबराव गंगथडे, सुधाकर पाटील, माधवराव नाखसाखरे, लक्ष्मण मुळे, मनोहर पाटील, पुंडलिक पेड आदी उपस्थित होते.
यावेळी आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, १० लाख रुपये खर्चून गावात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे गावचा विकास होण्यास मदत होणार आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, असेही ते म्हणाले.