...
रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे
रेणापूर : अत्यवस्थ असलेल्या कोरोना बाधितांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ सरवदे यांनी तहसीलदारांकडे निवदेनाद्वारे केली आहे. यवोळी श्रीमंत नागरगोजे, संतोष चव्हाण, श्रीकृष्ण पवार, मच्छिंद्र चक्रे, राहुल चव्हाण, प्रदीप पाटील, बालाजी पाटील आदी उपस्थित होते. सदरील इंजेक्शन रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
...
सेवानिवृत्त सुग्रीव कांबळे यांचा सत्कार
रेणापूर : तालुक्यातील दर्जी बोरगाव येथील चिन्मयानंद स्वामी विद्यालयातील सेवक सुग्रीव कांबळे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा संस्थाध्यक्ष संजय माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक अरुणकुमार झाडपिडे, शाम सरवदे, बापू गोरे, प्रेमचंद कदम, सूर्यकांत कसपटे, रविकिरण क्षीरसागर, अनंत साळुंके, सुरेश जाधव, दयानंद योगी आदी उपस्थित होते.
...
बोरसुरी उपकेंद्रात २२३ जणांना लसीकरण
निलंगा : तालुक्यातील बोरसुरी येथील आरोग्य उपकेंद्रात २२३ जणांना कोविड लस देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली ससाने, डॉ. वैभव कांबळे, व्ही.एस. शेख, उपसरपंच व्यंकट चामे, ग्रामसेवक राम मलिले, पार्वतीबाई वतने, सुषमा सूर्यवंशी, ललिता गायकवाड, ज्योती गिरमाजी, रेखा गारोळे आदी उपस्थित होते.
...
ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांचा सत्कार
उदगीर : तालुक्यातील बामणी येथील प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांच्या आळ आणि काळ या कथासंग्रहास पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उदगीर पालिका शिक्षण सभापती नागेश आष्टुरे, मसापचे शाखा उपाध्यक्ष विवेक होळसंबरे, सरपंच राजकुमार बिरादार, एकनाथ राऊत, मुरलीधर लासुणे, हणमंत गंगापूरे, शिवकुमार म्हेत्रे, शांतकुमार म्हेत्रे, विशाल म्हेत्रे आदी उपस्थित होते.
...
गाधवड उपकेंद्रात कोविड लसीकरण
लातूर : तालुक्यातील गाधवड येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाचे उद्घाटन गुरुवारी पंचायत समिती सदस्य भैरवनाथ पिसाळ, पोलीस पाटील संभाजी भिसे, सरपंच साहेबराव क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील, बाबासाहेब भिसे, उत्तमराव कदम, समाधान कदम, सावंत, डॉ. तुषार गायकवाड, डॉ. बी.बी. किर्ती, पुरी, नितळे आदी उपस्थित होते. यावेळी १३४ जणांना लस देण्यात आली.