अहमदपूर व चाकूर ग्रामीण रुग्णालय, शिरूर ताजबंद, किनगाव, हडोळती, सताळा, अंधोरी, चापोली, जानवळ, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची सोय होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, माजी सरपंच तथा निवृत्त कार्यकारी अभियंता ॲड. साहेबराव जाधव, जिल्हा परिषदेचे गटनेते मंचकराव पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सिद्धी शुगरचे संचालक सुरज पाटील, सरपंच पडोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सारोळे, तलाठी श्यामराव कुलकर्णी, प्रशांत भोसले, बालाजी पडोळे, फकिर अहमद, मल्लिकार्जून स्वामी, शिवाजी स्वामी, दत्ता पाटील, संदीप उगिले, रवि स्वामी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.