इयत्ता ५ वी ते ८ वी साठी रंगभरण स्पर्धा तर इयत्ता ९ वी ते १२ वी साठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन व संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा स्त्रोत (सौर व वारा), प्लास्टिक बंदी काळाची गरज आदी विषय ठेवण्यात आले आहेत. दोन्ही स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम पाच हजार, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार व उत्तेजनार्थ एकूण १० पारितोषिक १ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरूप ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे. सदरील स्पर्धांसाठी चित्र व कागद संयोजकांकडून पुरविले जाईल. कोरोराचे सर्व नियम पाळून या स्पर्धा होणार आहेत. तेंव्हा शहरातील जास्तीत जास्त शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास केदार, कार्यवाह रसूल पठाण, उपाध्यक्ष दयानंद बिरादार, सहकार्यवाह अनिता यलमटे, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, चंद्रदीप नादरगे, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योतीताई डोळे, रामेश्वर पटवारी, संदीप कानमंदे, रामेश्वर चाटे, विजय रकटे यांच्यासह न. प. चे सभापती, सदस्य व कर्मचाऱ्यांनी केले आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण, निबंध स्पर्धा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST