शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपानासाठी थांबविली दीड तास बस; वैतागलेल्या प्रवाशांनी वाहकाला आणले उचलून

By संदीप शिंदे | Updated: February 2, 2023 20:09 IST

घडलेला प्रकार कळल्यानंतर वाहकाला निलंबित केल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले.

लातूर : तिकिटे फाडून थकलेल्या एका वाहकाला सकाळी सकाळीच मद्यपानाची आठवण झाली. लातूरच्या बसस्थानकातून निघालेली कळंब आगाराची बस गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता काटगावमध्ये पोहोचली अन् वाहक महाशय मद्यालयाच्या शोधात गेले. जवळपास दीड तास परतले नाहीत. त्यामुळे चिंतित चालक आणि प्रवाशांनी शोध घेतला अन् वाहकाला अखेर एसटीत बसविले. घडलेला प्रकार कळल्यानंतर वाहकाला निलंबित केल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले.

लातूर बसस्थानकातून कळंब आगाराची बस (क्र. एमएच ११ बीएल ९३४) प्रवाशांना घेऊन कळंबकडे गुरुवारी सकाळी रवाना झाली. सव्वादहा वाजण्याच्या सुमारास लातूर तालुक्यातील काटगाव येथे ती पोहोचली. यावेळी वाहकाला मद्याची तलप झाली. त्याने बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यास चालकाला सांगितले. त्यानंतर त्याने गावात जिथे दारू मिळते त्या ठिकाणचा शोध घेऊन तिथेच पित बसला. तब्बल दीड तास झाला तरी परत आला नाही. प्रवाशांनी त्याचा शोध घेत धरून एसटीकडे आणले. दरम्यान, चालकाने ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. लातूरचे बसस्थानक प्रमुख हनुमंत चपटे यांनी कळंब डेपोच्या प्रमुखांशी संपर्क साधला. तोपर्यंत गाडी पुढे शिराढोणपर्यंत पोहोचली. कळंब डेपोचे प्रमुख मुकेश कोमटवाड यांनी संबंधित वाहकाच्या आरोग्य तपासणीचे निर्देश दिले. त्यानुसार वाहकाने मद्यसेवन केल्याचे निदर्शनास आल्याने त्यास निलंबित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ उस्मानाबादचे विभागीय वाहतूक नियंत्रक दिवटे यांनी सांगितले.

३८ प्रवासी बसले ताटकळत...मद्यप्राशन करण्यासाठी वाहक गेल्यामुळे या बसमधील ३८ प्रवाशांना दीड तास ताटकळत बसावे लागले. काही प्रवासी आणि काटगाव येथील नागरिकांनी संबंधित वाहकाला दारू पित बसलेल्या ठिकाणावरून अक्षरश: पकडून आणले. त्यानंतर बस कळंबकडे रवाना झाली. वाटेत शिराढोण येथे कळंब आगाराचे प्रमुख मुकेश कोमटवाड यांनी येऊन संबंधित वाहकाची चौकशी केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार वाहकाला निलंबित केले, असे विभागीय वाहतूक नियंत्रक दिवटे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरstate transportएसटी