शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

हेव्यादाव्यांमध्ये अडकली आदर्श ग्रामसेवकांची निवड! लातूरात चार वर्षांपासूनचे पुरस्कार रखडले

By हरी मोकाशे | Updated: December 27, 2023 18:22 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी तालुकापातळीवर आदर्श ग्रामसेवकांची निवड करून सन्मानित करण्यात येते.

लातूर : ग्रामपंचायतीच्या सर्व नोंदी, मासिक ग्रामसभा, करवसुली २५ बाबींमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात येते. त्यासाठी प्रस्तावही मागविण्यात आले होते. दरम्यान, ग्रामसेवकांचे अंतर्गत हेवेदावे अन् तक्रारींत निवड प्रक्रिया थांबली आहे. परिणामी, वास्तवात गावपातळीवर उत्कृष्ट कार्य केलेल्या ग्रामसेवकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

गावच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असते. गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे कार्य ते करतात. ग्रामपंचायतीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि कामकाज करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी तालुकापातळीवर आदर्श ग्रामसेवकांची निवड करून सन्मानित करण्यात येते. कोविडचा प्रादुर्भाव व तत्कालीन काही कारणांमुळे तालुकास्तरीय आदर्श ग्रामसेवकांची निवड चार वर्षांपासून रखडली आहे. ही निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला. मात्र, निवड समितीच्या बैठकीपूर्वीच तक्रारी येत आहेत. परिणामी, निवड थांबली आहे.

आगाऊ वेतनवाढ नसतानाही तक्रारी...

सन २०१७ पूर्वी निवडल्या गेलेल्या आदर्श ग्रामसेवकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्यात येत होती. तद्नंतर शासनाच्या निर्देशानुसार ती वेतनवाढ बंद झाली. आता केवळ मान-सन्मान केला जात आहे. तरीही तक्रारी येत असल्याने निवड प्रक्रिया थांबली आहे. सन २०१९ ते २०२३ या चार वर्षांतील निवड प्रक्रिया थांबली आहे. प्रत्येक तालुक्यातून एक अशा पद्धतीने चार वर्षांतील ४० ग्रामसेवकांचा गौरव होणे अपेक्षित आहे.

निलंगा तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव...तालुका - प्रस्तावऔसा - ०५शिरूर अनं. - ०८लातूर - ०५जळकोट - ०४अहमदपूर - ०६उदगीर - ०५रेणापूर - ०८देवणी - ०६चाकूर - ०४निलंगा - १०एकूण - ६१

निवडीपूर्वीच तक्रारींचा वाढला भडीमार...आदर्श ग्रामसेवक निवडीसाठी राज्य शासनाने २५ निकष लागू केले आहेत. त्यास एकूण ४०० गुण आहेत. त्यात सर्वाधिक गुण घेणाऱ्या ग्रामसेवकांची निवड केली जाते. ४० आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी ६१ प्रस्ताव दाखल झाले आहेत. दरम्यान, सीईओ, अतिरिक्त सीईओ, पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ, ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी यांची समिती निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक होण्यापूर्वीच तक्रारींचा भडीमार वाढला आहे.

अन् जिल्हा परिषदेने नियम केले कडक...वाढत्या तक्रारी पाहून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने निवडीचे नियम अधिक कडक केले आहेत. सदरील ग्रामसेवक विभागीय चौकशीत दोषी सिद्ध झाला आहे का, गुन्हा नोंद आहे का, पाच वर्षांत निवड झाली आहे का, गंभीर अनियमितता अथवा अपहाराच्या बाबीत समावेश आहे का हे पाहिले जाणार आहे. शिवाय, चारित्र्य प्रमाणपत्र असणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

सखाेल पडताळणीनंतर निवड केली जाणार...हेव्यादाव्यांमुळे तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाच्या निकषाबरोबरच जिल्हा परिषदेने काही नवीन नियम लागू केले आहेत. या सर्वांची पडताळणी करुन निवड केली जाणार आहे. अत्यंत पारदर्शकपणे निवडी समितीमार्फत ही प्रक्रिया होणार आहे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद