शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांचे स्वप्न पूर्ण! इस्रो सहलीसाठी लातूरच्या झेडपी शाळेतील ३० विद्यार्थी रवाना

By संदीप शिंदे | Updated: May 16, 2023 11:59 IST

विविध केंद्रांना भेट देणार : प्रत्येक तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश

लातूर : विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३० गुणवंत विद्यार्थ्यांची थुंबा येथील भारतीय अंतराळ संशोधन केंद्रास भेट देण्यासाठी लातूरची टीम मंगळवारी सकाळी रवाना झाली. १६ ते २० मे या कालावधीतील शैक्षणिक सहलीसाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, डायटच्या प्राचार्या डॉ. भागीरथी गिरी यांनी झेंडा दाखवून सहल त्रिवेंद्रमकडे रवाना केली.

इस्रो भेटीसाठी केंद्र, तालुका व जिल्हा अशा तीन पातळ्यांवर परीक्षामधून निवड झालेल्या ३० गुणवंत विद्यार्थ्यांना या हवाई सफरीसाठी निवडण्यात आले. या शैक्षणिक सहलीचे नेतृत्व प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे या करत असून, त्यांच्या समवेत जिल्ह्यातून ३० विद्यार्थी व १० अधिकारी,  शिक्षक यांची टीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था, थुंबा व इतर आठ शैक्षणिक स्थळांना भेट देवून उपग्रह प्रक्षेपनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत.  विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही हवाई सफर एक पर्वणीच ठरणार आहे. 

या ठिकाणांना भेटी देणार..सहली दरम्यान विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, थुंबा, केरला सायन्स सेंटर, पद्मनाभ स्वामी टेंपल, कोवलम बीच, लाईटहाऊस, बॉटनीकल गार्डन, प्राणीसंग्रहालय, एअरक्रॉफ्ट संग्रहालय, बिर्ला सायन्स सेंटर, गोवळकोंडा किल्ला आदी शैक्षणिक व वैज्ञानिक स्थळांना भेट देणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा ब्लेझर, शूजसह हवाई सफरीचा खर्च लातूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून केला जात आहे.

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळा