हाेणार आहे. वीजचाेरीविराेधात महावितरणच्यावतीने वर्षभर विशेष माेहीम सुरूच असते.
मीटरजप्ती अन् ५० हजारांपर्यंत दंड...
१ एखाद्याने आपल्या वीजमीटरमध्ये हेराफेरी केली तर त्याच्याविराेधात मीटर जप्तीची कारवाई करण्याची तरतूद आहे. शिवाय, ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड ठाेठावला जाण्याची शक्यता आहे.
२ एखाद्याने वीज चाेरून महावितरणचे केलेले नुकसान किंवा त्यापेक्षा अधिक दंड ठाेठावण्यात येताे. शिवाय, फाैजदारी स्वरूपाचा खटलाही दाखल केला जाताे.
कधीही हाेऊ शकते मीटरची तपासणी...
एखाद्या वीज ग्राहकाला सातत्याने येणारे कमी वीज बिल, संशयास्पद बिल याबाबत चाैकशी करण्याचे अधिकार महावितरणच्या भरारी पथकाला आहेत. मीटरमध्ये हेराफेरी केल्याचा संशय आल्यास कधीही तपासणी केली जाऊ शकते.
तपासणीत मीटरमध्ये हेराफेरी केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित ग्राहकावर, वीज चाेरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तडजाेडीची रक्कम न भरल्यास खटलाही दाखल करण्यात येताे.
किती दिवसांपासून वीज चाेरी केली. किती रुपयांची वीजचाेरी झाली. याचा तपास केल्यानंतर संबंधितांकडून ही रक्क्म, दंड वसूल केला जाताे. त्याचबराेबर कायमचे वीजपुरवठा खंडित करण्याचीही कारवाई केली जाते.
वीजचाेरीविराेधात विशेष कारवाई माेहीम...
महावितरणच्या लातूर परिमंडळात वीजचाेरीविराेधात विशेष पथकाकडून माेहीम हाती घेतली जाते. ही माेहीम वर्षभर सुुरू राहते. वीजग्राहकांनी आपल्या मीटरबाबत काही तक्रार असेल तर जवळच्या कार्यालयाकडे संपर्क साधून तक्रार दाखल करावी. याबाबत याेग्य ताे निर्णय घेतला जाईल. शिवाय, मीटरची तपासणी करून त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.