अतनूर येथील अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अतनूर ग्रामविकास पॅनलने ११ पैकी ९ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. यावेळी बाबू राघू कापसे, पूजा सुनील कोकणे, लीना विजय गव्हाणे, चंद्रशेखर अशोकराव गव्हाणे, संजीवनी राहुल गायकवाड, आरती प्रमोदकुमार संगेवार, प्रभू सटवा गायकवाड, विठ्ठल सोपान बारसुळे, दैवशाला साहेबराव गव्हाणे आदी सर्व नूतन सदस्य उपस्थित होते.
निवड प्रक्रियेदरम्यान ग्रामसेवक एफ. एफ. शेख, तलाठी ए. एच. शेख यांनी सहायक म्हणून काम पाहिले. यावेळी पोलीस जमादार जी.आर. पवार, पोलीसपाटील पी.व्ही.गव्हाणे-पाटील, खंडू गायकवाड, किसन बारसुळे, रामचंद्र गायकवाड, गुंडू बोडेवार यांची उपस्थिती हाेती. निवडीबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जळकोट तालुकाध्यक्ष विनोद कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी काैतुक केले आहे.