शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच केंद्रातील सरकार पडणार: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:18 IST

काँग्रेसचा सर्वधर्म समभावाचा विचार कसा नष्ट करता येईल यासाठी भाजपा खेळ करीत आहे.

लातूर/ निलंगा/ रेणापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच दिल्लीत कुबड्यांवर असलेले सरकार पडणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे शुक्रवारी केले.

लातूर, निलंगा, रेणापूर येथे काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या धाेरणावर कडाडून टीका केली. मंचावर उमेदवार माजी मंत्री आ. अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे उमेदवार आ. धीरज देशमुख, निलंग्याचे उमेदवार अभय साळुंके, अल्पसंख्यांक विभगाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. वजाहत मिर्जा, खा. डॉ. शिवाजी काळगे, माजी खा. सुधाकर श्रृंगारे, माजी आ. रामहरी रूपनर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नाना पटोले म्हणाले, काँग्रेसचा सर्वधर्म समभावाचा विचार कसा नष्ट करता येईल यासाठी भाजपा खेळ करीत आहे. राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून देशात भ्रष्टाचाराची स्पर्धा झाली तर महाराष्ट्र अव्वल येईल. सर्वच अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी रेटकार्ड ठरले आहे, त्यासाठी सर्वसामान्यांची लूट होत आहे. या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचे नाही, सत्तेच्या जोरावर संविधान संपविण्यासाठी यांचे षडयंत्र आहे. शिवद्रोही आणि गुजरातधार्जिणे हे महायुतीचे सरकार सत्तेतून हद्दपार करण्याची गरज आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर येणार असून लाडक्या बहिणींना तीन हजार, मोफत बस प्रवास आणि सुशिक्षित बेरोजगारांना ४ हजार रूपये भत्ता, शेतीमालाला हमीभाव, लातूरला डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे स्मारक उभारणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सरकारी कचेऱ्यांना दलालांनी घेरलेसभेत माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले, शासकीय कार्यालयांना दलालांनी घेरले आहे. हे चित्र महाविकास आघाडीचे सरकार येताच बदलून टाकू. महायुतीने महागाई, बेरोजगारी वाढविली. साेयाबीनला भाव नाही, कायदा सुव्यवस्था ढासळली, अशीही टीका त्यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकlatur-city-acलातूर शहरlatur-rural-acलातूर ग्रामीणnilanga-acनिलंगा