शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

शिक्षण अन् आरोग्य केंद्रस्थानी; लातूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर

By हरी मोकाशे | Published: March 06, 2024 5:54 PM

समाजकल्याण, कृषी विभागात यंदा नवीन योजना

लातूर : ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांना पायाभूत आणि अत्याधुनिक सोयी- सुविधा पुरविणे तसेच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी प्रोत्साहन देण्याकडे जिल्हा परिषदेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळावी म्हणून भरीव तरतूद जिल्हा परिषदेने आगामी वर्षासाठीच्या शिलकी अंदाजपत्रकात केली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनमोल सागर यांच्यासमोर मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ चा ३५ कोटी ४० लाख २६ हजार १३५ रुपयांच्या जमेचा आणि ३० कोटी ८० लाख १४ हजारांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला. तो प्रशासक सागर यांनी मंजूर केला. विशेषत: सलग तिसऱ्या वर्षी प्रशासकांनी अर्थसंकल्प मंजूर केला आहे. यात ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी- सुविधा, अंगणवाडींना विविध प्रकारचे साहित्य पुरविणे, वन स्टॉप प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे.

पूर्णाकृती पुतळ्यासाठी सव्वा कोटींची तरतूद...माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जिल्हा परिषदेच्या प्रागंणात पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी १ कोटी २० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आगामी पदाधिकाऱ्यांसाठीही २ कोटी १७ लाखांचा भरीव निधी आहे.

आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया कक्ष...प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा गुणवत्तपूर्ण मिळाव्यात तसेच आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया कक्षासाठी यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा करण्यात येणार आहे.

आधुनिक पध्दतीचे शेतकऱ्यांना बियाणे...केंद्र शासनाने भरड धान्य वर्ष घोषित केल्याने तसेच ग्रामीण भागात उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत शेती असल्याने त्यातून अधिकाधिक उत्पादन मिळावे म्हणून शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीचे बियाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.

मागास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल...समाजकल्याण विभागाअंतर्गत मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्याकरिता १० लाख राहणार आहेत. तसेच वसतीगृहांना पायाभूत सुविधा व इतर सहाय्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या प्रगतीसाठी शेळी गटाकरिता १ कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी दिली.

३५ कोटी ४० लाखांचे अंदाजपत्रक...सामान्य प्रशासन - ३ कोटी ४३ लाखशिक्षण - ३ कोटी ९५ लाखबांधकाम - ४ कोटी ४० लाखलघुपाटबंधारे - १० लाखआरोग्य - १ कोटी ३५ लाखपाणीपुरवठा - ३ कोटी ५० लाखकृषी - १ कोटी २५ लाखपशुसंवर्धन - १ कोटी ९७ लाखसमाजकल्याण - ३ कोटी १५ लाखमहिला व बालकल्याण - १ कोटी ९८ लाखसंकीर्ण - २ कोटी ३६ लाख.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद