शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; दोन हजार पोलिस बंदोबस्तावर !

By राजकुमार जोंधळे | Updated: September 27, 2023 18:55 IST

श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी एकूण ६५ ठिकाणे निश्चित केली असून, त्या ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन होणार आहे.

लातूर : आपल्या लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिवणुकीची जय्यत तयारी केली आहे. गुरवारी निघणाऱ्या विसर्जन मिवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. याबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बुधवारी सांयकाळी दिली. 

लातूर शहरासह जिल्ह्यात यंदा  जवळपास १ हजार २८४ गणेश मंडळांनी यंदा श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा जल्लोष आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. गुरूवार,२८ सप्टेंबरला श्री गणरायाच्या मुर्तिचे विसर्जन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लातूर शहरातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली असून, पोलीस प्रशासनही सज्ज आहे . एकूण १ हजार २८४ गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे.

लातुरात ६५ मूर्ती संकलन केंद्र स्थापन...श्री गणेश विसर्जन मिरवणुक काळात लातूर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस पथके, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस मदत केंद्र, तसेच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर १२८ सीसीटीव्ही कॅमऱ्यांची नजर रहणार आहे. श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी एकूण ६५ ठिकाणे निश्चित केली असून, त्या ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन होणार आहे.

तगडा पोलिस बंदोबस्त...लातूर जिल्ह्यामध्ये विसर्जन मिरवणूक काळात ७ पोलीस उपाधीक्षक , २७ पोलीस निरीक्षक, ७२ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ९५८ पोलीस अंमलदार, त्यांच्या मदतीला ९८५ होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दंगा काबू पथकाचे चार प्लाटून, तसेच शिघ्रकृती दलाचे दोन पथक तैनात करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :laturलातूरGanpati Festivalगणेशोत्सव