लातूर : काेराेनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा कहर अधिक हाेता. त्यामुळे या काळात मृत्यूंचे प्रमाणही अधिक हाेते. आता काेराेना विषाणूमुळे काही रुग्णांना आराेग्याच्या नव्या समस्या भेडसावत आहेत. शरिरातील वेगवेगळ्या अवयवांवर काेराेना विषाणूचा परिणाम हाेत आहे. विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, किडनीचे साैम्य आजाराचे प्रमाणही समाेर आले आहे. काहींना डायलिसिस तर काहींना किडनी प्रत्याराेपण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे किडनीबाबत काही लक्षणे आढळून आली तर तातडीने डाॅक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्यात काेराेनाच्या पहिल्या लाटेवर प्रशासनाला नियंत्रण मिळवता आले. त्यानंतर टप्प्याटप्प्यांनी बाधितांची संख्या वाढत गेली. दुसऱ्या लाटेने सर्वच जनजीवन प्रभावित झाले. रुग्णालयात खाटाही अपुऱ्या पडू लागल्या. आता काेराेनाचा प्रभाव ओसरु लागला आहे. मात्र, काेराेनातून बरे झालेल्या बाधितांना नवनवीन आराेग्याच्या समस्या भेडसावत आहेत. एप्रिलमध्ये काेराेनाबाधितांचा आकडा हजारांच्या पुढे गेला हाेता. सध्या काेराेना रुग्णांची संख्या घटली असली, तरी काेराेनानंतर वेगवेगळ्या आजारांनी रुग्ण आणि कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. पाेटदुखी, सांधेदुखी, शरिरावर खाज येणे, किडनी, हृदयराेग, मधुमेहासह इतर आजारांना त्यांना ताेंड द्यावे लागत आहे.
किडनीचा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यास
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना बाधा झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. काेराेनाची बाधा झाल्यानंतर काही आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यात किडनी, मधुमेह, हृदयविकार, पाेटदुखी, सांधेदुखी आदी आजार असलेल्यांनी आपल्या फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत.
हे करा
काेराेनाचा कहर आता ओसरत असल्याने बाजारपेठांतही गर्दी हाेत आहे. त्यामुळे गर्दीत जाण्याचे टाळावे.
राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घ्या, दररोज व्यायाम, याेगासने करण्याची गरज आहे.
घराबाहेर पडल्यानंतर मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, सतत हात धुवा, साेशल डिस्टन्सिंग पाळा.
हे करु नका
काेराेनाबाधित रुग्णांची परिस्थिती पाहून उपचारासाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या आणि निर्णय घ्या.
काेणत्याही प्रकारचा आजार, अंगदुखी, ताप, खाेकला अंगावर काढू नका शिवाय मनानेच गाेळ्या-औषधे घेऊ नका.
काही प्राथमिक लक्षणे आढळल्यास, आपल्या फॅमिली डाॅक्टरांचा तातडीने सल्ला घ्यावा.