शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालकांनो जनावरांना द्या लस अन् ताप, गर्भपात, वासरांचा मृत्यू टाळा 

By हरी मोकाशे | Updated: January 6, 2024 17:43 IST

विषाणूजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक लस

 

लातूर : पशुधनांमध्ये ताप येऊ नये, गर्भपात होऊ नये तसेच विषाणूजन्य आजार उद्भवू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात लाळ्या- खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ५ लाख १४ हजार ६४५ जनावरांना लस देण्यात येणार आहे.

वातावरणातील बदलामुळे जनावरांमध्ये विविध आजार उद्भवतात. त्यामुळे पशुपालकांना उपचारासाठी खर्च करावा लागतो. शिवाय, वेळेत उपचार न झाल्यास पशुधन दगावण्याचीही भीती असते. परिणामी, शेतकरी, पशुपालकांची आर्थिक हानी होते. अशाप्रकारचे नुकसान होऊ नये तसेच जनावरे व्यवस्थित रहावीत म्हणून शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वर्षातून दोनदा लाळ्या खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यातील १ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली असून १५ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. प्रत्येक पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.

४ लाख ३७ हजार लसी उपलब्ध...जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गीय पशुधन ५ लाख १४ हजार ६४५ आहेत. शासनाकडून लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधात्मकच्या ४ लाख ३७ हजार ५०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १२९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्याअंतर्गत गाय व म्हशीस लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात १ लाख ४५ हजार शेळ्या तर ३५ हजार मेंढ्या आहेत. त्यांच्यासाठीही १ लाख ८४ हजार लसी उपलब्ध झाल्या असून त्यांनाही लसीकरण केले जात आहे.

लसीअभावी अशा प्रकारचे होऊ शकतात आजार...गायी- म्हशीस लाळ्या खुरकत लस न दिल्यास जनावरांत तोंड येणे, ताप येणे, दूध उत्पादनात घट होणे, पशुधनाची कार्यक्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. शिवाय, गर्भपात होणे, लहान वासरु दगावण्याचीही भीती असते. तसेच शेळ्या- मेंढ्यांमध्ये हगवण लागणे, तोंड येणे, ताप येणे, चारा खाणे बंद होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्याचबरोबर लहान पिलांचा मृत्यूहीही होण्याची भीती असते.

पशुधनास लस द्यावी...जनावरांतील विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी गायी- म्हशीस लाळ्या खुरकत लसीकरण करुन घ्यावे. तसेच शेळ्या- मेंढ्यांनाही लस देऊन घ्यावी. त्यामुळे पशुधन व्यवस्थित राहील. सदरील आजार उद्भवण्याची भीती राहणार नाही. लसीकरणासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करुन घ्यावे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

 

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी