शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या तक्रारीवरून लातुरात उपजिल्हाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा; जिवे मारण्याचा प्रयत्न 

By आशपाक पठाण | Updated: December 14, 2022 22:32 IST

हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ

लातूर : हुंडा व इतर किरकोळ कारणावरून मानसिक, शारीरिक छळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार लातूरचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात उपजिल्हाधिकारी महाडिक यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत म्हटले आहे, २०१८ मध्ये माझा विवाह झाला आहे. तेव्हापासून हुंडा व किरकोळ कारणांसाठी माझा मानसिक, शारीरिक छळ करण्यात आला. २ एप्रिल २०२१ मध्ये माझ्या पतीने मला व मुलास माहेरी सोडले. त्यानंतर मला नांदवण्यास तयार नव्हते. त्यामुळे मी पुणे येथील हिंजवडी येथे नोकरी करून माझ्या मुलासोबत राहत होते. तरीही पतीने मला वारंवार फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली.

त्यावेळी मी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने कलम ४९८ अ, ५०६ ५०४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पती गणेश महाडिक यांनी माझ्याशी चर्चा केली, मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लातूर येथे वास्तव्यास आले. २३ मे २०२२ रोजी घरात सासूसोबत वाद झाला. माझ्या हाताला धरून पतीने घराबाहेर हाकलून दिले. अर्ध्या तासांनी घरात घेतल्यावर मला मारहाण करण्यात आली. यात माझ्या पाठीवर व उजव्या बरगडीवर मार लागल्याने रुग्णालयात दाखविले असता तीन बरगड्या मोडल्या असल्याचे सांगितले. 

१३ डिसेंबर रोजी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून तक्रार दिल्याने गणेश भिकाजी महाडिक, सासू लता भिकाजी महाडिक यांच्यावर कलम ४९८ अ, ३०७, ३२६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पी.एल. निळकंठे हे करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर