ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या मतमोजणीची प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. ११ फेरीत एकूण १८ टेबलवरून मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली. तालुक्यात ही ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची झाल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.
हाळी ग्रामपंचायतीचा सर्वात शेवटी निकाल...
पहिल्या फेरीत अवलकोंडा, आडोळवाडी, आरसनाळ, इस्मालपूर, एकुर्का रोड, करखेली ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीत करडखेल, करवंदी, कासराळ, किनी यल्लादेवी, कुमठा खु., तिसऱ्या फेरीत कुमदाळ उदगीर, कुमदाळ हेर, कोदळी, कौळखेड, खेर्डा खु., गंगापूर, चौथ्या फेरीत गुडसूर, गुरधाळ, चांदेगाव, चिघळी, जानापूर, पाचव्या फेरीत डाऊळ हिप्परगा, डोंगरशेळकी, तादलापूर, दावणगाव, धोंडीहिप्परगा, सहाव्या फेरीत नळगीर, निडेबन, पिंपरी, बामणी, सातव्या फेरीत बेलसकरगा, बोरगाव बु., भाकसखेडा, मल्लापूर, मांजरी, मादलापूर, आठव्या फेरीत माळेवाडी, येणकी, लिंबगाव, लोणी, लोहारा, नवव्या फेरीत वागदरी, वाढवणा खु., वाढवणा बु., शिरोळ जानापूर, दहाव्या फेरीत शेल्हाळ, सुमठाणा, हंगरगा कु., हंडरगुळी, हकनकवाडी आणि शेवटच्या व अकराव्या फेरीत हाही, हिप्परगा डाऊळ, हेर, होनी हिप्परगा येथील ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे.