शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरवर उपचाराचा दावा, भूत, भानामतीची भीती दाखवून गंडविणारा भोंदू गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 08:15 IST

अंनिस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने भोंदूचा भांडाफोड केला

किनगाव : भूत, करणी, भानामतीची अंधश्रद्धा पसरवित, ती उतरविण्याचा दावा करत अनेकांना गंडविणाऱ्या भोंदूला किनगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा गजाआड केले. विशेष म्हणजे भोंदूने कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, मणक्याचे आजार दूर करण्याच्या बहाण्याने अनेकांना नादाला लावले होते. अखेर अंनिस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने भोंदूचा भांडाफोड केला.

पोलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील बाबा हकानी इस्माईल शेख आपल्या घरी दर गुरुवारी अमावास्या, पौर्णिमेला दरबार भरवत होता. मूल होत नसेल, धंद्यात बरकत, घरात शांती नसेल, घरातील तंटे यावरही इलाज सांगत असे. दरम्यान, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भोंदूगिरीची खात्री करून जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना माहिती दिली. उपाधीक्षक बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक चिदंबर कामठेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, उपनिरीक्षक राजेश जाधव, मुरलीधर मुरकुटे, शिवाजी तोपरपे चमूने धाड टाकून हकानी बाबाला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध अमानूष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियमच्या कलम ३ (२) व ४२० नुसार गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र अंनिसचे माधव बावगे, रुक्साना सय्यद, रणजीत आचार्य, सुधीर भोसले, हनुमंत मुंडे, दगडूसाहेब पडिले यांनी प्रत्यक्ष पाठपुरावा करून भांडाफोड केला.

लिंबू डोळ्यात पिळणे...कोंबड्या उतरविणे, भक्ताच्या ऐपतीप्रमाणे कंदुरी, दानपेटीत दान, बाबाच्या फोटोपुढे किमान पन्नास, शंभर, पाचशेच्या नोटा टाकायला सांगायचा. उपचार म्हणून लिंबू कापून नाका डोळ्यात पिळणे, उपचाराला आलेल्यांच्या अंगाला स्पर्श करून लिंबू चोळणे, कोंबडीची मान मोडून भक्तांच्या अंगावरून उतरवणे, असे उपचार करायचा. या भोंदूचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे सहकार्य मिळाले. सामान्य लोकांची फसवणूक थांबली. - माधव बावगे, राज्य प्रधान सचिव, अंनिस

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर