शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट

By हरी मोकाशे | Updated: September 7, 2022 13:55 IST

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी जावे लागत आहे. तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजही करावे लागत आहे.

लातूर : सध्या मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम सुरु आहे. त्यासाठी शिक्षकांना दैनंदिन कामकाजातून पूर्णवेळ सूट देण्यात यावी, अशी मागणी औसा तालुका शिक्षक संघटनेच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली होती. त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे १३ सप्टेंबरपर्यंत ऑनड्युटी मतदान ओळखपत्रास आधारकार्ड लिंक करण्यासाठी सूट देण्यात आली आहे.

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी जावे लागत आहे. तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजही करावे लागत आहे. त्यामुळे बीएलओंना दैनंदिन कामकाजातून पूर्णवेळ सूट देण्यात यावी, अशी मागणी औसा तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी सूचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याची दखल घेऊन १३ सप्टेंबरपर्यंत ऑनड्यूटी मतदान ओळखपत्रास आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी सूट देण्यात आली आहे.

या कामी नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर, सुरेश पाटील, महसूल सहाय्यक शरद मोरे, भीमाशंकर वाडेकर, एस.डी. सूर्यवंशी आदींचे सहकार्य लाभले. यावेळी तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार, दीपक चामे, गोविंद जगताप, मोहन सावंत, डी.झेड. गायकवाड, दयानंद वायदंडे, आर.डी. जाधव आदी उपस्थित होते. या निर्णयामुळे सुरेश सुडे, प्रदीप ढेंकरे, संजय बिरादार, अमोल राठोड, चंद्रकांत तोळमारे, अतुल क्षीरसागर, जगन्नाथ पांढरे, शिवाजी चौहाण यांच्यासह बीएलओंनी समाधान व्यक्त केले.

२५४ बीएलओंना लाभ...बहुतांश बीएलओ शिक्षकांकडे १३०० पेक्षा जास्त मतदार आहेत. तसेच काही शिक्षकांकडे ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे दोन-तीन अशी गावे आहेत. एक बीएलओ दररोज अधिकाधिक ६० नोंदणी करू शकतो. त्यामुळे हे काम विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी ही ऑनड्युटी आवश्यक होती. त्याचा औसा तालुक्यातील २५४ बीएलओंना लाभ मिळणार आहे.- दयानंद बिराजदार, तालुकाध्यक्ष, शिक्षक काँग्रेस.

टॅग्स :laturलातूरAdhar Cardआधार कार्डElectionनिवडणूकTeacherशिक्षक