शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण आंदोलन! धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू; दोन दिवसानंतर प्रवाशांनाही दिलासा

By आशपाक पठाण | Updated: February 18, 2024 17:03 IST

रविवारी धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

लातूर: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या मागील तीन दिवसांपासून बंद आहेत. रविवारी धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. दोन जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम असल्याने खबरदारी म्हणून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. लातूर आगारातून शुक्रवार, शनिवार व रविवारीही अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.

शनिवारी पहाटे ४ वाजेपासूनच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या, तसेच लांब पल्ल्याच्या सर्व बसेस थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे शनिवारी ६०३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. जिल्हांतर्गत निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, शिरूर अनंतपाळसह ग्रामीण भागातील बसेस सुरू होत्या. रविवारी सकाळी धाराशिव आणि नांदेड मार्ग वगळता इतर मार्गावरील सर्व बसेस सोडण्यात आल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपाेषणाला बसल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे काढली जात आहेत. त्यामुळे शुक्रवार, शनिवार दोन दिवस लातूर आगारातून लांब पल्ल्याच्या सर्व बसेस डेपोतच थांबविण्यात आल्या होत्या. रविवारी बसेस सुरू झाल्यामुळे प्रवाशांचीही सोय झाली आहे.

तिसऱ्या दिवशी बससेवा सुरळीत...मराठा आरक्षणाच्या धास्तीने लातूर विभागातून राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या सर्व बसेस दोन दिवस डेपोतच थांबविण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, साेलापूर, बीड, परभणी आदी मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या दिवशी बहुतांश मार्गावरील बससेवा सुरू केली आहे. केवळ धाराशिव आणि नांदेड मार्गावरील बसेस रविवारीही थांबविण्यात आल्या. - संदीप पडवळ, जिल्हा वाहतूक अधिकारी, एस.टी. महामंडळ.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षण