जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी वैशाली जामदार व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांची पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागी फुलारी व मोरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला. दरम्यान, तीन महिन्यांच्या कालावधीत प्राथमिक विभागाचा पदभार विशाल दशवंत, तर माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला. हा पदभार देताना समकक्ष अधिकारी अथवा सेवाज्येष्ठतेचे पालन करण्यात आले नाही, असे जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. संतोष वाघमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
प्रशासकीय दृष्टिकोनातून पदभार...
प्रशासकीय दृष्टिकोनातून दशवंत आणि अंधारे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नियमित अधिकारी नियुक्त झाल्यानंतर त्यांचा पदभार आपोआप संपुष्टात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.