लातुरात जयंती उत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा
लातूर : महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सवतामुलक स्वाभिमानी समाज संस्थेच्या वतीने मंगळवार, १३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १२.३० या कालावधीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली जाणार आहे. सदरची स्पर्धा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात होणार आहे. या स्पर्धेत इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
महावीर कटके यांना पीएच.डी. पदवी प्रदान
लातूर : कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालयातील ग्रंथपाल महावीर कटके यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. या यशाबद्दल डाॅ. सुरेश जांगे, डाॅ. वैजयंता पाटील, डाॅ. विक्रम गिरी, डाॅ. बी.आर. लोकलवार, डाॅ. धनंजय मोतेवाड, डाॅ. अंकुश भंडे, प्रा. मारुती बिडवे आदींनी कौतुक केले आहे.
रस्त्यावर खड्डेच खड्डे, ग्रामस्थ, वाहनधारक त्रस्त
लातूर : जिल्ह्यातील चाकूर ते वाढवणा पाटी याअंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही ठिकाणी थातूरमातूर डागडुजी करण्यात आली आहे, तर पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत आहेत.