रेणापूर येथील शिबिरांचे उद्घाटन काँग्रेसचे रेणापूर तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्या हस्ते झाले. प्रारंभी लाेकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी शहराध्यक्ष तुकाराम कोल्हे, नगर पंचायतीचे काँग्रेसचे गटनेते शिवाजी पाटील, संगायो कमिटीचे अध्यक्ष गोविंद पाटील, कमलाकर अकनगिरे, रमेश बोने, खैसर अली सय्यद, अजय चक्रे, महादेव बरिदे, माजी सभापती उमाकांत खलंग्रे यांची उपस्थिती होती. रेणापूर तालुका काँग्रेसच्या वतीने तालुक्यात शिबिराचे आयोजन केले होते. शनिवारी पोहरेगाव येथे ६६ दात्यांनी रक्तदान केले. बिटरगाव २०, लखमापूर ६१, खरोळा ४१, पानगाव ५५ दात्यांनी रक्तदान केले. रविवारी रेणापुरात ५३ दात्यांनी रक्तदान केले. तालुक्यात सहा ठिकाणच्या शिबिरात २९६ रक्तदान झाल्याची माहिती रेणापूर तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांनी दिली. रेणा साखर कारखाना येथे ५१ जणांनी रक्तदान केले. यावेळी रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाइस चेअरमन अनंतराव देशमुख, संचालक संभाजी रेड्डी, संग्राम माटेकर, अनिल कुटवाड, लालासाहेब चव्हाण यांच्यासह संचालक, कर्मचारी, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
रेणापूर तालुक्यात २९६ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST