या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित बेळकोणे, बालाजी वळसंगीकर, अमित मानकरी, वैजनाथ लुल्ले, मलबा घोणसे, राहुल बालुरे, देविदास पतंगे, रशीदवाले अकबर सय्यद कमालवाडीकर, औदुंबर पांचाळ, जावेद तांबोळी, सुभाष पाटील, नीळकंठ भोसले, प्रताप कोयले, कृष्णा पाटील, शेख जिलानी, जावेद येरवळे, नामदेव मोराळे, प्रभाकर पांडे, महादेव मळभागे, विठ्ठल देवनाळे, जाफर मोमीन, शेख माजिद शेख मौजुद युसूफ बुधलेकर, शिवाजी राठोड, शेख करीम, अय्याज उंटवाले, शेख शकील, अमित सूर्यवंशी, विद्यासागर शिंदे, शिवा कांबळे, मुस्तफा सौदागर, शेख रौफ, बिस्मिल्ला येरवळे, अक्षय शिंदे, राजकुमार राठोड आदी सहभागी झाले होते.
दिल्लीतील आंदोलनाचे समर्थन...
केंद्र सरकाने मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी करीत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला. आंदोलनानंतर काँग्रेसच्या वतीने प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंगारे व पोलीस उपनिरीक्षक रंजित काथवटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.