शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची आघाडी

By admin | Updated: October 23, 2014 00:15 IST

व्ही़एसक़ुलकर्णी ,उदगीर उदगीर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर

व्ही़एसक़ुलकर्णी ,उदगीरउदगीर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस अन् राष्ट्रवादीचेच प्रभूत्व आहे़ तरीही मागील लोकसभा अन् आताच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारुन काँग्रेस-राकाँला पिछाडीवर नेले आहे़ उदगीर पालिकेत ३३ पैकी २६ नगरसेवक काँग्रेसचे आहेत़ जिल्हा परिषदेचे ६ पैकी ५ गट व पंचायत समितीचे १२ पैकी १० गण काँग्रेसकडे आहेत़ जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समितीही काँग्रेसकडेच आहे़ दुसरीकडे जळकोट तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीची पकड आहे़ ३ पैकी २ जिल्हा परिषदेचे गट व ६ पैकी ४ पंचायत समिती गण राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ या दोन्ही तालुक्यात भाजपाच्या वाट्याला केवळ १ जिल्हा परिषद गट व ३ पंचायत समिती गण आले आहेत़ स्थानिक स्वराज्य संस्थांत इतकी सुमार कामगिरी करणाऱ्या भाजपाला मतदारांनी मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र भरभरुन मदत केली आहे़२००७ साली झालेल्या जि़प़ व पं़स़ निवडणुकीत उदगीर तालुक्यातून सर्वाधिक मते राकाँला २४०१० इतकी होती़ भाजपाला १५७७३ तर काँग्रेसला ११७३२ मते पडली होती़ दरम्यान, २०१२च्या निवडणुकांमध्ये ४०१७३ मते घेऊन काँग्रेस एक नंबरवर राहिली़ दुसऱ्या क्रमांकावरील भाजपाला २३४८० तर घसरण झालेल्या राकाँला २०२४१ मते होती़ जळकोट तालुक्यातही भाजपा पिछाडीवरच राहिली होती़ स्थानिक स्वराज्य संस्थेत मतांची अशी समीकरणे असतानाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून ४७ हजार मतांची आघाडी भाजपाला मिळाली़ उदगीर शहरातून ४९३३ मताधिक्य लोकसभेला होते़ यावेळी युती तुटल्याने त्याचा फटका बसून विधानसभेत २२१७ मताधिक्य भाजपाला मिळाले़ उदगीरमध्ये भाजपाला १४९८८, राकाँला १२७७३ तर काँग्रेसला ६४२० मते पडली आहेत़ जळकोट शहरातून भाजपाला २९१ मतांची आघाडी मिळाली़ तर तालुक्यातून १९२१ मतांची आघाडी मिळाली़ लोकसभेला मतदारसंघातील जायभायची वाडी येथील केंद्रावर काँग्रेसला केवळ ३ मते पडली होती़ तुलनेने भाजपाला मात्र ३३२ मते मिळाली़ विधानसभेला मतदारसंघातील सर्वाधिक मतदानाचा टक्का जायभायची वाडीच्या केंद्राचाच राहिला़ यावेळी मात्र काँग्रेसला येथून १७३ मते मिळाली़