कारची जाेराची धडक, एक जण जखमी
लातूर : कारने जाेराची धडक दिल्याची घटना लातूर शहरातील बाभळगाव नाका रिंग राेड परिसरात शुक्रवार, २० ऑगस्ट राेजी घडली. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, पाेलीस नाईक सतीश शेषराव लाेंढे वय ५२ रा. लातूर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अमाेल शांतप्पा ताडमाडगे वय ३१ रा. बामणी ता. जि. लातूर याने आपल्या ताब्यातील कार एम.एच. २४ ए.एस. ८७५४ हयगय व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीस जाेराची धडक दिली. यामध्ये फिर्यादी हा जखमी झाला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून कार चालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेहेकाॅ काेकणे करीत आहेत.
निलंगा शहरातून दुचाकीची चाेरी
लातूर : एका किराणा दुकानासमाेर थांबविण्यात आलेली माेटारसायकल अज्ञात चाेरट्यांनी पळविल्याची घटना निलंगा शहरात गुरुवार, १९ ऑगस्ट राेजी घडली. याबाबत निलंगा पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी घन:शाम राजप्पा हत्ते वय ३१ रा. दापका ता. निलंगा यांनी आपल्या ताब्यातील माेटारसायकल एम.एच. २४ बी.ए. ८३२७ निलंगा शहरातील एका किराणा दुकानासमाेर पार्किंग केली हाेती. दरम्यान, ती अज्ञात चाेरट्यांनी चाेरून नेली. याबाबत निलंगा पाेलीस ठाण्यात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस नाईक पडिले करीत आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून माेटारसायकल चाेरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.
काठीने मारहाण, दाेघांविरुद्ध गुन्हा
लातूर : तू कामावर असताना आम्हाला वाकडे का बाेललास म्हणून काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना निलंगा येथे शुक्रवारी घडली. याबाबत निलंगा पाेलीस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी कंकालकुमार ऊर्फ विशालकुमार पुलाेदास वय १९ रा. लाेकमानपूर जि. बगलपूर, बिहार यांना संदीप सूर्यवंशी याच्यासह अन्य एकाने दाेघेही रा. शिवाजीनगर, निलंगा तू आम्हाला वाकडे का बाेललास म्हणून फिर्यादीच्या डाेक्यात काठीने मारहाण करून जखमी केले, शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत निलंगा पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस नाईक शिंदे करीत आहेत.
दुचाकी चाेरीप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल
लातूर : शहरातील एका रुग्णालयाच्या समाेर थांबविण्यात आलेली माेटारसायकल अज्ञात चाेरट्यांनी चाेरून नेल्याची घटना १४ ऑगस्ट राेजी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी बसवराज रामप्पा स्वामी वय ३६ रा. गिरवलकरनगर, लातूर यांनी आपल्या ताब्यातील माेटारसायकल एम.एच. २४ ए.झेड. ७९५० एका खासगी रुग्णालयासमाेर थांबविली हाेती. दरम्यान, ती अज्ञाताने पळविली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेहेकाॅ भताने करीत आहेत.