शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लातूर महापालिकेचा मोठा निर्णय; एक रकमी मालमत्ता कर भरल्यास व्याजात शंभर टक्के सूट

By हणमंत गायकवाड | Updated: March 13, 2024 16:48 IST

३१ मार्चपूर्वी चालू व थकित करभरणा करणे आवश्यक

लातूर : थकीत मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना मनपाकडून अनोखी सवलत देण्यात येत असून ३१ मार्चपूर्वी आपल्या कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांचे कराच्या रकमेवर आकारण्यात आलेले संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे कर थकलेला आहे.अनेकवेळा सूचना करून व नोटीसा देऊनही या कराचा भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनपाने थकीत करावर २ टक्के व्याज आकारलेले आहे. तरी देखील मालमत्ता कराचा भरणा होत नसल्याने मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी नियम ५१ अन्वये व्याजामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत व चालू कराचा एकरकमी भरणा ३१ मार्च २०२४ पूर्वी केला तर अशा मालमत्ताधारकांना व्याजातून १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेत शहरातील मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत  व चालू मालमत्ता कराचा एकत्रित भरणा पालिकेकडे करावा,असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.सवलत देऊनही जे नागरिक कर भरणा करणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील केल्या जातील.संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल.त्यामुळे मालमत्ता धारकांनी आपल्याकडील करांचा भरणा मनपाकडे करून मनपास सहकार्य करावे,असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

संघटनांच्या पाठपुराव्याला आले यश...मालमत्ताकराच्या व्याजात सूट मिळावी, अशी मागणी विविध संघटनांनी आयुक्तांकडे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, स्थायी समितीचे माजी सभापती ॲड. दीपक मठपती यांच्यासह अनेकांनी सूट देण्याची मागणी केली होती.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर