पुणे येथील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲड. राजरत्न शिलवंत यांच्यावतीने मंगळवारी सकाळी धम्मविधी भंते सुमेदजी नागसेन यांच्याहस्ते करून पानगावात ९ व्या अशोक स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचूड चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शीला आचार्य, इम्रान मनियार यांच्याहस्ते अशोक स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व्ही. के. आचार्य होते. सचिव वैभव आचार्य, एम. बी. कांबळे, राहुल कासारे, आनंद आचार्य, अर्जुन दांडे, अशोक गायकवाड, शिवपद आचार्य, जयदीप आचार्य, अमित आचार्य, संगीता आचार्य, हरिबाई आचार्य आदींसह अशोक स्तंभ स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.