हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी येथे रविवारी विविध विकासकामांतर्गत रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
हाळी येथील मानपडे गल्ली व ग्रामपंचायतीशेजारील माने वसाहतीत काही वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. जिल्हा परिषद सदस्य शीतल पाटील यांच्या फंडातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, चेअरमन अशोकराव माने, उपसरपंच राजकुमार पाटील, ग्रामविकास अधिकारी मनोहर जानतिने, माजी चेअरमन शिवाजीराव ईबितवार, माजी सरपंच माधवराव माने, आलिम तांबोळी, पोलीसपाटील बालाजी गोडे, ग्रामपंचायत सदस्य माधव धनुरे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश माने, प्रकाश बच्चेवार, पी. एम. मसुरे, गौतम कांबळे, आदी उपस्थित होते.
===Photopath===
230521\img-20210523-wa0081.jpg
===Caption===
फोटो