कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाची गती वाढावी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा बेळसांगवीचे सरपंच धर्मपाल देवशेट्टे यांनी पुढाकार घेतला. बुधवारी एकाच दिवशी गावातील ४५ वर्षांपुढील १४७ जणांना कोविड लसीकरण करून घेतले आहे. यापूर्वी ६० जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंत २०७ जणांनी लस घेतली आहे.
यावेळी परिचारिका वाघमारे, चोले, शेख, उपसरपंच मीनाबाई वाघमारे, चेअरमन बालाजी गवळे, चंद्रकांत सोमुसे, विनायक पाटील, धनराज डुमणे, अंकुश पाटील, रमेश एकघरे, अंकुश नकुरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी धर्मपाल देवशेट्टे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने शासन नियमांचे पालन करावे. तसेच गावातील नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे.