बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, परिवीक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी जिथीन रहेमान, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीपान साबदे, डॉ. मुंदडा, डॉ. विनोद कंदापुरे, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. श्याम सोमाणी, डॉ. काळगे, डॉ. राहुल लटुरिया, आदींची उपस्थिती होती.
डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी, डॉक्टर्स, नर्स व इतर आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने दर्जेदार प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. सुजित देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीपान साबदे, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. श्याम सोमाणी, आयएएमएचे अध्यक्ष डॉ. कुलकर्णी, डॉ. मुंदडा यांनी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपाययोजनेबाबत व औषधी वापराबाबत प्रशासनाला माहिती दिली.