माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिथे शाखा नाही तसेच आठवडी बाजार असलेल्या ठिकाणी ही मोबाईल व्हॅन बँकिंग सेवा देण्यात येणार आहे. त्या पद्धतीने बँकेच्या प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी आठवडी बाजार, जिथे दळणवळण व्यवस्था नाही अशा ठिकाणी सेवा देण्याचा उपक्रम राबवत असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. श्रीपतराव काकडे यांनी दिली.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोअर बँकिंग सेवा व्हॅनद्वारे ग्रामीण भागात शेतकरी, सभासद, ग्राहक यांना देण्यात आल्याने ग्राहकांना आधार मिळाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन बँकिंग सेवेचा ग्रामीण भागातील शेतकरी, ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन ॲड. श्रीपतराव काकडे, व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, कार्यकारी संचालक हणमंत जाधव आदींसह संचालक मंडळ यांनी केले आहे.