शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्यात बांबू टास्क फोर्स: पाशा पटेल

By हरी मोकाशे | Updated: January 19, 2024 19:37 IST

बांबू हे पीक कमी पाणी लागणारे तसेच जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे असल्याने पर्यावरण स्नेही आहे.

लातूर : वातावरणातील बदलाच्या संकटाला रोखण्यासाठी बांबू लागवड महत्त्वाची आहे. राज्यात बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. २० जणांची ही समिती वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, टास्क फोर्सचे सदस्य पाशा पटेल यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, टास्क फोर्समध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सहअध्यक्ष असतील. तसेच वनमंत्री सुधीर मुनंगटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, जलसंधारण मंत्री संजय राठोड, रोहयो मंत्री संदीपान भुमरे आदींचा समावेश आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना दुष्काळ आणि अवकाळी पाऊस, अशा दुहेरी संकटांना सामोरे जावे लागले. बांबू हे पीक कमी पाणी लागणारे तसेच जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे असल्याने पर्यावरण स्नेही आहे. राज्यात बांबू लागवड केल्यास वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्याबरोबरच रोहयोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार आहे, असेही पटेल यांनी सांगितले.

बांबूच्या औद्योगिक धोरणाची सुरुवात...राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पटेल म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयामार्फत बांबूच्या औद्योगिक धोरणाची सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाने देशातील सर्व वीज निर्मिती करणाऱ्या औष्णिक केंद्रात ७ टक्के बायोमास म्हणून बांबूच्या वापरास मान्यता दिली आहे. भारत सरकार बांबूच्या संशोधनासाठी १ हजार कोटींचा निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूरPasha Patelपाशा पटेल