आई-वडिलांना डायबिटीज असेल तर
वातावरणात थंडी आणि पाणी पिण्याचे प्रमाण जास्त असल्यास बाळ डायपर ओले करणारच. आई-वडिलांना डायबिटीज असला तरी बाळाला डायबिटीज होण्याचा धोका अजिबात नाही.
आहाराकडे असावे लक्ष
आहाराकडे लक्ष असावे लागते. थंडीच्या वातावरणात उबदार कपडे घालावेत. सर्दी, ताप होणार नाही याकडे कटाक्ष असावा.
प्रमाणात आहार आणि पाणी पाजायला हवे.
वजन कमी-जास्त होत असेल तरच ५ टक्क्यांपेक्षा कमी बाळामध्ये टाईप १ डायबिटिज असू शकतो.
बालरोगतज्ज्ञ म्हणतात
बाळ डायपर ओले करीत असेल तर डायबिटीजचा अजिबात धोका असू शकत नाही. पालकांनी या अनुषंगाने काळजी करण्याची गरज नाही. मात्र, बाळाच्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज असते.
- डॉ. वर्धमान उदगीरकर.
पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि दूध पाजण्याच्या पद्धतीमध्ये बाळ डायपर ओले करीत असते. पाणीमिश्रित आहार दिल्यामुळेही डायपर ओले करण्याचे प्रमाण अधिक असते. टाईप १ डायबिटिज वगैरे हा प्रकार नसतो.
- डॉ. एस. के. मुंदडा.