शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी

By आशपाक पठाण | Updated: August 15, 2022 02:45 IST

मूळचे उदगीर येथील रहिवासी असलेले गुलाम महेबूब गल्लेकाटू हे १९९६ साली लातूर जिल्हा पोलीस दलात रूजू झाले.

लातूर : येथील दहशतवाद विरोधी कक्षात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले गुलाम महेबूब गुलाम हैदर गल्लेकाटू यांना पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पोलीस पदक रविवारी जाहीर करण्यात आले. पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, निलंगा येथील महामंडळाच्या कर्मचाऱ्याची लूट आदी प्रकरणांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. 

मूळचे उदगीर येथील रहिवासी असलेले गुलाम महेबूब गल्लेकाटू हे १९९६ साली लातूर जिल्हा पोलीस दलात रूजू झाले. त्यांनी लातूर शहर, शिरूर अनंतपाळ, गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण पथक, उदगीर ग्रामीण, लातूर ग्रामीण, शहर वाहतूक शाखा आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. सध्या ते दहशतवाद विरोधी कक्षात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. 

२०१३ मध्ये एटीएसमध्ये कार्यरत असताना पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, परभणी येथील आयएसआय तपासात भरपूर मेहनत घेतली. २००८ मध्ये निलंगा येथील एसटी महामंडळाच्या रोखपालाचे १२ लाख लूट प्रकरण, नळेगाव येथील एसटीत स्फोट प्रकरणातील आरोपींना २४ तासांत अटक केली. यासह विविध प्रकरणांच्या तपासकामात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांच्या कार्याबद्दल दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन अपर पोलीस महासंचालक, पालकमंत्री, पोलीस अधीक्षक यांच्याकडून वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. पदक जाहीर होताच महेबूब गल्लेकाटू यांचा त्यांच्या पत्नी सईदा बेगम, मुलगा गुलाम मुज्तबा, मुलगी जुवेरिया यांनी पेढा भरवून कौतुक केले.

३६ वर्षांतील सेवेचे फळ मिळाले...गुलाम महेबूब गल्लेकाटू म्हणाले, मागील ३६ वर्षांपासून मी लातूर जिल्हा पोलीस दलात विविध ठिकाणी काम केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अनेक गुन्ह्यांचे तपास केले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या सहकार्यामुळे चांगली कामगिरी करू शकलो. शासनाकडून मिळालेल्या या प्रेरणेमुळे उर्वरित सेवेत आणखीन उत्साहाने काम करता येईल.

टॅग्स :PoliceपोलिसPresidentराष्ट्राध्यक्षIndependence Dayस्वातंत्र्य दिन