शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेरच्या रात्री जिल्हा परिषदेत ‘जागरण- गोंधळ’; दिवसभरात कोषागारकडे २७ बिले सादर

By हरी मोकाशे | Updated: April 1, 2024 17:24 IST

मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरू असते.

लातूर : मार्चअखेरमुळे पूर्ण झालेल्या कामांची बिले लवकरात लवकर मंजूर करुन ती काढण्यासाठी गुत्तेदारांची तर देयके विनाविलंब दिली जावीत म्हणून कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदीसाठी जिल्हा परिषदेत घाई होती. त्यामुळे रविवारी रात्री अधिकारी- कर्मचाऱ्यांचे जागरण सुरु होते, तर आपली बिले लवकर मंजूर करावीत म्हणून काही कंत्राटदारांचा गोंधळ सुरु होता. दरम्यान, जिल्हा परिषदेकडून एकाच दिवसात कोषागार कार्यालयाकडे २७ बिले सादर करण्यात आली आहेत.

मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरू असते. शासनाकडून उपलब्ध निधीचा तात्काळ वापर व्हावा जोरदार प्रयत्न सुरू असतात. शिवाय, शासनाकडून विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. जिल्हा परिषदेंतर्गतच्या विविध योजना, विकास कामांसाठी प्राप्त निधीचा मुदतीत निपटारा व्हावा म्हणून सीईओंनी २९ मार्चची सार्वजनिक सुटी तर ३० आणि ३१ मार्च रोजीची साप्ताहिक सुटी रद्द करुन या तिन्ही दिवशी जिल्हा परिषद सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते.

बिलाच्या मंजुरीसाठी ऑनलाईन नोंदीची अट...मार्चअखेरमुळे पूर्ण करण्यात आलेल्या कामांची बिले काढण्यासाठी सर्वांची घाई असते. त्यामुळे यंत्रणेवर ताण येतो. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून शासनाने रविवारी सायंकाळी ६ वा.पर्यंत झेडपीएफएमएस पोर्टलवर ऑनलाईन बिल अपलोड करावे आणि त्यानंतर ते बिल संबंधिताच्या खात्यावर जमा होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, संकेतस्थळ वारंवार हँग होत असल्याने मोठी अडचण झाली होती.

बांधकाम विभागात ९३ बिले सादर...रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे एकूण ९३ बिले सादर करण्यात आली. त्यापैकी केवळ २३ बिले ऑनलाईन झाली आहेत. उर्वरित ७० बिले ऑफलाईनरित्या स्विकारण्यात आली आहेत. शासनाचे आदेश आल्यानंतर ती ऑनलाईनरित्या अपलोड करुन मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

ऑफलाईन नोंदीसाठी टोकन...बिल मंजुरीचे प्रस्ताव पाहून बांधकाम विभागाने टोकन पध्दतीने क्रमांक दिले होते. त्यानुसार बिल घेऊन त्याची छाननी केली जात होती. दरम्यान, काहींनी आपले बिल अगोदर घ्यावे म्हणून गोंधळही घातला. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जागरण वाढले.

एकाच दिवसात १४ कोटीची बिले...शिक्षण, बांधकाम, पंचायत, समाजकल्याण, कृषी व पशूसंवर्धन विभागाची रविवारी एकाच दिवशी १४ कोटी ५५ लाख ४८ हजारांची २७ बिले कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहेत.- आप्पासाहेब चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद