शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

लातूरमधील हत्या कोचिंग क्लासेसमधील स्पर्धेतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:35 IST

शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे येथील कोचिंग क्लासेसची उलाढाल कोट्यवधी रुपयांवर गेली आहे. त्यातून निर्माण झालेल्या व्यावसायिक स्पर्धेतून कोचिंग क्लास संचालकाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे

लातूर : शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे येथील कोचिंग क्लासेसची उलाढाल कोट्यवधी रुपयांवर गेली आहे. त्यातून निर्माण झालेल्या व्यावसायिक स्पर्धेतून कोचिंग क्लास संचालकाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री एका प्राध्यापकासह पाच जणांना अटक केली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हत्येसाठी २० लाखांत सुपारी दिल्याचे समोर आले आहे़‘स्टेप बाय स्टेप’ कोचिंग क्लासचे संचालक अविनाश बाबुराव चव्हाण यांची रविवारी रात्री गोळ्या झाडून हत्या झाली. पोलिसांनी हत्येप्रकरणी कुमार मॅथ्स क्लासचे संचालक प्रा़ चंदनकुमार शर्मा याच्यासह अक्षय भिवा शेंडगे, करण चंद्रपाल सिंग गहीरवार, शरद सूर्यकांत घुमे, महेशचंद्र प्रभाकरराव घोडके यांना सोमवारी मध्यरात्री लातुरातून अटक केली़त्यांच्याकडून पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे आणि रोख २ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे़, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ शिवाजी राठोड यांनी दिली़हत्येनंतर देवदर्शनरविवारी रात्री पावणेबारावाजता अक्षय शेंडगे व करण गहिरवार यांनी चव्हाण यांच्यावर गोळ्या झाडल्या.त्यानंतर, ते भाड्याच्या वाहनाने देवदर्शनासाठी रवाना झाले.पहिला प्रयत्न फसलाचव्हाण यांच्या हत्येची तयारी दोन आठवड्यांपासून मारेकऱ्यांकडून सुरू होती़ १० जून रोजी टेहळणी करण्यात आली़ मात्र, १३ जून रोजी पावसामुळे हत्येचा प्रयत्न फसला होता.मूळचा बिहारचा असलेला प्रा़ चंदनकुमार शर्मा व अविनाश चव्हाण यांनी एके काळी भागीदारीत कोचिंग क्लास सुरू केला होता़ अविनाश चव्हाण यांनी २०१५ मध्ये ‘स्टेप बाय स्टेप’ स्वतंत्र कोचिंग क्लास सुरू केला. व्यावसायिक स्पर्धेतून एकमेकांत वैर निर्माण झाले होते. त्यातून २० लाखांची सुपारी देऊन चव्हाण यांची हत्या घडवून आणली, अशी कबुली शर्मा याने दिली़ मारेकºयांना १० लाख रुपये देण्यात आले होते.३६ तासांत गुन्ह्याचा छडाअंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा शिवारात मारेकºयांनी रंगीत तालीम केली होती़गुन्ह्याचा छडा ३६ तासांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.