सुधाकर जायभाये यांची अध्यक्षपदी निवड
लातूर : महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेच्या अध्यक्षपदी सुधाकर जायभाये तर सरचिटणीसपदी नवनाथ पवार यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत विश्वास साळुंके, सुधीर इंगळे, खेरामज तिवाडे, राजेश्वर क्षीरसागर, लक्ष्मण वाघ, राजेश बडनखे, यशवंत गमरे, प्रफुल्ल शेरकी, राजेसाहेब रोंगे, महेश अहिरे, रामनाथ नागरगोजे, शीतल शिवपुजे, किरण पवार, आनंद कोटकर, नितीन भालेराव, बी.आर. जाधव, अतुल भोसले, महादेव कड, सादिक शेख, अशोक भुसेवार, सुनील बोयनार, राजेंद्र कुंभार, हरिभाऊ नागरे यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल माधव गोरखवाड, संजय तांबटकर, सुनील कडवे, ज्ञानेश्वर चामले, अशोक मुंडे, प्रशांत दाते आदींनी कौतुक केले आहे.
शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण
लातूर : संगनमत करून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील कड्याने डाव्या डोळ्याच्या खाली मारून फिर्यादीस जखमी केल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे घडली. या प्रकरणी फिर्यादी श्रीकांत पांडुरंग वाघमारे यांच्या तक्रारीवरून किशोर ज्ञानोबा वाघमारे व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. सरोदे करीत आहेत.
माझ्याकडे रागाने का बघतोस म्हणून मारहाण
लातूर : माझ्याकडे रागाने का बघत आहेस, असे विचारले असता तू काय लई भारी आहेस असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीस हातातील काठीने डोक्यात, पाठीत व हातावर मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी अझरोद्दीन सयाजोद्दीन राजा पटेल यांच्या तक्रारीवरून ताहेर, अबरार, अमन (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. उदगीर) यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. रंगवाड करीत आहेत.
सोयाबीन गुळीच्या बनिमीला आग; २५ हजारांचे नुकसान
लातूर : फिर्यादीचे नुकसान व्हावे या उद्देशाने फिर्यादीच्या घरासमोर ठेवलेला जनावरांचा चारा, सोयाबीन गुळीच्या बनिमीला डिझेल टाकून आग लावून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना निलंगा तालुक्याील दापका (पु.) येथील बालाजी नगर येथे घडली. या प्रकरणी फिर्यादी देविदास खंडू घोडके (रा. बालाजी नगर दापका, ता. निलंगा) यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. सूर्यवंशी करीत आहेत.