शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

२६८ किमी विकाराबाद- परळी लोहमार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी

By संदीप शिंदे | Updated: August 8, 2023 19:01 IST

विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत.

उदगीर : येथील उदगीर रेल्वे संघर्ष समितीने स्थापनेपासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, रेल्वे प्रशासनाने नुकत्याच काढलेल्या पत्रकानुसार विकाराबाद-परळी या २६७.७७ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरण मागणीला फायनल लोकेशन सर्वेक्षणसाठी दिल्ली बोर्डाने मान्यता दिली आहे.

विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. हैदराबाद ते मनमाड, हैदराबाद ते नांदेड यासह अनेक ठिकाणे जोडणारा हा सुलभ मार्ग आहे. या दुहेरीकरणाच्या मागणीसाठी कायम आग्रही असणारे बिदरचे केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन राहिले आहे. ही योजना मंजूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मंजुरीबद्दल परिसरातून आभार व्यक्त होत आहेत.

विद्युतीकरणाचा शिल्लक राहिलेला अंतिम टप्पा आणि दुहेरीकरणाला मिळालेली मंजुरी या भागातील सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे या लोहमार्गावरील प्रवास, अधिक गतिमान, पर्यावरणपूरक, इंधन व वेळ बचत करणारा ठरणार आहे.

विकाराबाद ते परळी मार्गावर धावणाऱ्या गाड्या...हैदराबाद- औरंगाबाद, हैदराबाद- पूर्णा, काकीनाडा- शिर्डी, विजयवाडा- शिर्डी, सिकंदराबाद- शिर्डी, तिरुपती- शिर्डी, रेनिगुंटा- औरंगाबाद, नांदेड- बंगळुरू याशिवाय मालगाडी या लोहमार्गावरून धावते. विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. हैदराबाद ते मनमाड, हैदराबाद ते नांदेड यासह अनेक ठिकाणे जोडणारा हा सुलभ मार्ग आहे.

रेल्वे विकासात ही मंजुरी महत्त्वपूर्ण उदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने समितीच्या स्थापनेपासून विकाराबाद ते परळी लोहमार्ग दुहेरीकरणासाठी पाठपुरावा होत आहे. उशिरा का होईना याला मंजुरी मिळाली. यासाठी समितीला मंत्री, खासदार, आमदार यांचे सहकार्य लाभले. उदगीर व परिसरातील रेल्वे विकासात ही मंजुरी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे तथा उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतिलाल डोईजोडे यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेlaturलातूर